>> प्रकल्पाचे स्वरूप आणि खर्च
वाढते शहरीकरण आणि भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणारी अवजड वाहतूक लक्षात घेता, मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ६,७४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या सहा पदरी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
>> कसा असणार उन्नत मार्ग
हा मार्ग ठाण्यातील आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाला जोडला जाईल. राजनौली जंक्शनपर्यंत हा मार्ग उन्नत (Elevated) असेल. पुढे सोनाळे गावापासून उजवीकडे वळण घेऊन हा मार्ग करवली आणि आमणे गावाजवळ समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.
advertisement
>> टोल आकारणी का?
'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकल्पाचा वाढता खर्च, जमिनीचे संपादन आणि बांधकामाची किंमत भरून काढण्यासाठी टोलचा पर्याय निवडण्यात आला आहे. सध्या समृद्धी महामार्गावरून आमणेपर्यंत येताना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कटकट दूर करण्यासाठी एमएमआरडीएने हा 'कनेक्टर' प्रस्तावित केला आहे.
>> का घेतला निर्णय?
ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आमणे ते ठाणे या ३० किलोमीटरच्या टप्प्यात वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक पोलिसांच्या नियोजनानंतरही ही कोंडी सुटत नसल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून साकेत-आमणे या थेट मार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे.
