TRENDING:

छ. ‎संभाजीनगरात पार पडला सामूहिक तुळशी विवाह‎, पंचक्रोशीत चर्चा

Last Updated:

तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की सामूहिक विवाह सोहळा पार पडतो पण छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये सामूहिक तुळशी विवाह पार पडलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की सामूहिक विवाह सोहळा पार पडतो पण छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये सामूहिक तुळशी विवाह पार पडलेला आहे. शहरातील कुलस्वामिनी   मंगल कार्यालय या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. तर हा विवाह सोहळा  कसा होता किंवा काय संकल्पना होती याविषयीची माहिती सांगितलेली आहे अध्यक्ष विलास कोरडे यांनी.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी शहरांमध्ये या विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात येतो. शहरांमधील कुलस्वामिनी मंगल कार्यालय या ठिकाणी आज सोहळा पार पडला. मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला महिलांनी छान असा डान्स देखील केला त्यानंतर मंडपामध्ये जाऊन तुळशीचा विवाह पार पडला आरती करण्यात आली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

अडीचशे पेक्षा जास्त महिला आणि सर्व वऱ्हाडी मंडळी या सोहळ्यासाठी आले होते. आपली पारंपरिक संस्कृती जपता यावी त्याकरता आम्ही अगदी पारंपारिक पद्धतीने या ठिकाणी तुळशीचा विवाह सोहळा पार पडला मोठ्या प्रमाणात महिला छान सहभागी झाल्या त्यासोबतच या ठिकाणी जा देखील महिला आल्या होत्या त्यांना एक तुळस देखील भेटत असतो म्हणून दिलेले आहे अशा पद्धतीने हा सगळा पार पडला आणि आपले संस्कृती सर्वांना कळविण्यात करता आम्ही हे करत असतो असं अध्यक्ष विलास कोरडे म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ. ‎संभाजीनगरात पार पडला सामूहिक तुळशी विवाह‎, पंचक्रोशीत चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल