शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे.आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत.
advertisement
या प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली, यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला, यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटनी घडली आहे.
मी दिलेला शब्द पाळतो- एकनाथ शिंदे
मी दिलेला शब्द पाळतो,त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे,असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे सांगलीच्या वाळवा येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली.त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी सांगलीची माणसं फक्त चांगली नाहीत तर देव माणस आहेत आणि चांगल्या माणसांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं असं विधान करत वाळवा ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याबाबत प्रस्तावावर आचारसंहिता संपल्यावर नक्कीच विचार केला जाईल असा आश्वासन वाळवेकरांना दिले. या सभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत,वाळव्याचे माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
