पण महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे, ती सांगलीच्या पठ्ठ्याची. याचं कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी असणाऱ्या एका विद्यार्थ्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत. त्याने प्रत्येक विषयात ३५ मार्क पाडत हा विक्रम केला आहे. सगळ्यात विषयात काठावर पास झाल्याने या विद्यार्थ्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
हेमंत किरण सटाले असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावातील रहिवासी आहे. यंदा त्याने कोल्हापूर विभागातून बारावीची परीक्षा दिली होती. त्याने बारावीच्या परीक्षेत सर्व विषयात 35 गुण पाडलेत. 12 वीचा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या टेक्नॉलॉजी या विभागात त्याचा प्रवेश होता. तो आटपाडी तालुक्यातील दिघंचीमधील इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेज मध्ये शिकत होता.
advertisement
हेमंतला इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन्स, ट्रेड थेअरी आणि रोजगार कौशल्य असे एकूण सहा विषय अभ्यासाला होते. या सहाही विषयात हेमंतने काटावर पास होत, म्हणजे ३५ गुण मिळवत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला एकूण ६०० गुणांपैकी २१० गुण मिळाले आहेत. हेमंतची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.