जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. शासन आमचे पैसे देत नाही, असे कारण सांगून तरूण कंत्राटदाराने आपले आयुष्य संपवले. बिले वेळेत मिळत नसल्याने, मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन कंत्राटदाराने आत्महत्या केली.
वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील (वय ३५) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्याने जीवन संपवले.
advertisement
शासनाकडे १ कोटी ४० लाखांची रक्कम थकीत असल्याने हर्षल याने टोकाचे पाऊल उचलले. हात उसने आणि सावकारांकडून घेतलेले पैसे परतफेड कसे करायचे असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. कामे पूर्ण करूनही बिले वेळेत नसल्याने हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे.