सांगली : धर्मांतर करण्यासाठी दबाव असल्याने सांगलीत सात महिन्याच्या गर्भवतीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.या प्रकरणी पती आणि सासू सासऱ्याला अटक करण्यात आलीय.मात्र घरचे सोडून धर्मांतर करण्यासाठी आणखी कोण प्रवृत्त करत होते याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
सांगलीच्या ऋतुजा राजगेने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने तिचा मानसिक आणि छळ गेल्या तीन चार वर्षापासून सासरच्या मंडळीकडून सुरू होता. धनगर समाजातली हुशार आणि होतकरू ऋतुजाला अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जायचे होते.मात्र मर्चंट नेव्हीत असलेल्या धनगर समजतीलच सुकुमार राजगे यांच्याशी 2021 मध्ये तिचा विवाह झाला.हिंदू पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्याला पैपहून्यानी नांदा सौख्यभरेचा आशीर्वाद दिला.मात्र लग्नानंतर सासरी आलेल्या ऋतुजाला हिंदू रीतिरिवाज न पाळता ख्रिश्चन रीतिरिवाज करण्यासाठी कुटुंबाने दबाव सुरू केला. लग्नाच्या पहिल्याच वटपौर्णिमेला तिला विरोध झाला आणि त्याच वेळेपासून तिचा संघर्ष सुरू झाला.
advertisement
ऋतुजाच्या मृत्यूनंतर आई काय म्हणाली?
गर्भवती असल्याने ओटी भरण्याची कार्यक्रमही तिला करू दिला नाही.अशातच चार वर्षाच्या संघर्षानंतर अखेर तिने पोटातील सात महिन्याच्या बाळासह गळफास घेऊन आत्महत्या केली. माझी मुलगी मरून गेली पण धर्मपरिवर्तनला बळी पडली नाही मात्र सासरच्या लोकांनी तिला ठार मारल्याचा आरोप ऋतुजाच्या आईने केला आहे.
ऋतुजा आणि तिच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल
ऋतुजाच्या अशा जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय.ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील शोकमग्न अवस्थेत तिच्या आठवणीत जगत आहेत. ऋतुजला तिच्या कुटुंबाने तर मारलेच पण तिला धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर हिप्नॉटिझम सारखे प्रकार करण्यासाठी तिचे कुटुंबीय ज्या लोकांना आणत होते त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. तर ऋतुजा आणि तिच्या बाळाच्या मृत्युप्रकरणी खुनाचे गुन्हेही दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.
धर्मांतर बंदीचा कायदा करण्याचा ठराव ग्रामस्थ करणार
सांगलीत घडलेल्या या प्रकाराने संताप व्यक्त होत असून याच्या मुळशी जाण्याची गरज सांगलीच्या जनतेने आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता गंडेवाडी गावाने पुढाकार घेतलाय. लवकरच ग्रामसभा घेऊन धर्मांतर बंदीचा कायदा करण्याचा ठराव ग्रामस्थ करणार आहेत. तर 17 तारखेला सांगलीत कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे .
सांगलीत घडलेल्या या घटनेने धर्मांतराचे वास्तव समोर आलाय.त्यातून दुसरी ऋतुजा निर्माण होण्यापूर्वी असे प्रकर रोखून त्यावर कडक निर्बंध आणण्याची गरज आहे