जरांगे पाटील यांच्या सभास्थळाजवळ दुचाकींनी घेतला पेट
मनोज जरांगे यांच्या सभास्थळावरुन जवळच दोन दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळालेल्या वाहनांमध्ये एक इलेक्ट्रिक तर एक पेट्रोल दुचाकी गाडी जळून खाक झाली. अचानकपणे या दोन्ही गाड्या पेटल्याने महापालिका अग्निशमन विभागाला तातडीने बोलावण्यात आलं. यानंतर अग्निशमन विभागाने या दोन्ही गाड्यांच्या आगीवर नियंत्रण आणले. मनोज जरांगे पाटील हे राम मंदिर येथे सभास्थळी बोलण्यास उभे झाल्यानंतर त्यांच्या सभेच्या काही अंतरावर असणाऱ्या अर्बन बँकेजवळ एका तळघरात दुचाकी पेटल्याची घटना घडली.
advertisement
वाचा - कोल्हापुरात प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी! PHOTOS
सरकार आरक्षण देणार नसेल तर जिल्ह्यातील विधानसभेत बुक्का करा : मनोज जरांगे
सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर, मराठ्यांनो सांगलीत विधानसभेला बुक्का करा, असं जाहीर आवाहन मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय. सांगलीमध्ये आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण शांतता पार पडली. विश्रामबाग चौकापासून राम मंदिर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. एक मराठा, लाख मराठा जयघोषाने संपूर्ण सांगली नगरी दुमदुमून गेली होती. राम मंदिर इथल्या चौकात शांतता रॅलीची मनोज जरांगेंच्या जाहीर सभेने सांगता झाली. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला. तसेच नुकतंच सांगली कोल्हापूरला आलेल्या महापुराचा उल्लेख करत राज्य सरकारने तातडीने बुडालेल्या शेतीबद्दल शेतकऱ्यांना नुकसान द्यावे, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली.