बिरोबाच्या बनात दसरा मेळाव्यात पार पडतोय. राजे महाराजांच्या काळात ढोल वाजवला जात होता आणि याचा निनाद वारंवार वाजवला पाहिजे जेणेकरून प्रस्थापितना धडकी भरली पाहिजे. आज अनेक प्रश्न मनात आहेत. ते सोडवण्यासाठी आपण झगडतोय. धनगरांची जागर यात्रा केली त्यावेळी लबाड लंडग्यांनी पिलावळ विष पेरायला सुरवात केली असं म्हणत पडळकरांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.
advertisement
शरद पवार यांचा पुन्हा लबाड लांडगा असा उल्लेख करताना मराठा आरक्षणावरूनही गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. ते म्हणाले की, लबाड लांडग्याने मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला. तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतुन फुटला. पुतण्या पार्टीतून फुटला यामध्ये दुसऱ्याचा काय दोष आहे. हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या द्यायला लागले.
महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा केली होती बहुजनांना एक करण्याची आणि या लांडग्याला माहित आहे बहुजन एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे तुकडे केले त्याच्यानंतर संघर्ष होता. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते पण गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवले असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
