नगरसेवक ते महापौर...
साधा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा प्रवास सुरेश पाटील यांचा राहिला आहे. त्यांच्या आत्महत्याच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .सांगलीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
advertisement
अतिदक्षता विभागात उपचार सुरू
दरम्यान, धक्कादायक घटना समोर येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुरेश पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजतंय. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेल्या सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल का उचललं? असा सवाल आता विचारला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरेश पाटील सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडे अलिप्त झाले होते. मात्र, गेल्या रविवारी सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, काल सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.