TRENDING:

Sangli Crime : 'माझ्या बायकोचं अफेअर आहे'; पतीने व्हिडिओ शूट करत संपवलं जीवन, सांगलीतील घटना

Last Updated:

Sangli Crime : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली, 27 सप्टेंबर (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील जत शहरात ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करताना पतीने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग केले. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितलं आहे.
पतीने व्हिडिओ शूट करत संपवलं जीवन
पतीने व्हिडिओ शूट करत संपवलं जीवन
advertisement

पत्नीसह सासरच्यांवर गंभीर आरोप

पत्नीच्या अनैतिक संबंधाचा आरोप करत सांगलीच्या जतमधील एकाने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत शहरातील दत्त कॉलनीतील दत्तात्रय निंगाप्पा कोळी (वय 46) यांनी ही आत्महत्या केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून कोळी यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत कोळी यांच्या पत्नी व सासूसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल

पत्नी सुश्मिता, सासू शोभा शिवगोंडा माळी, बाबुराव कागवाडे व सुनील कागवाडे (सर्व रा. जत) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी दत्तात्रय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. रुक्मिणी सदाशिव कोळी यांनी फिर्याद दिली. दत्तात्रय कोळी दत्त कॉलनीमध्ये राहण्यास होते. मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाइलवर एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये आपली पत्नी व तिच्यासोबत असलेल्या कागवाडे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

advertisement

चिठ्ठीत पोलिसांवरही गंभीर आरोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

जत पोलिसांत चारवेळा तक्रार करूनही दखल न घेतल्याने कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख आहे. सासू देखील माझ्या पत्नीलाच साथ देत होती. माझ्या पत्नीमुळे आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडीओ दत्तात्रय यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Crime : 'माझ्या बायकोचं अफेअर आहे'; पतीने व्हिडिओ शूट करत संपवलं जीवन, सांगलीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल