संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राऊत म्हणतात, एकनाथ शिंदे ऊठसुठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात. पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. त्यासोबतच हे विचारण्याची हिंमत नाही, असा टोला देखील त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
advertisement
दरम्यान शपथविधीच्या दिवशीही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. एकनाथ शिंदे शंभर टक्के उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, त्यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत नाही. अडीच वर्षापु्र्वी ही हिंमत नव्हती म्हणूनच तर त्यांनी शिवसेना सोडली,अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती.
जाहिरातीत मोठी चूक
महायुतीच्या या जाहिरातीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील टीका केली आहे.जाहिरातींमध्ये वरील बाजूला महापुरुषांचे फोटो छापले आहे. यामध्ये शाहू महाराजांचा फोटो न झापल्याने संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे म्हणाले, जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी.
