संजय राऊत माध्यमांशी दिल्लीत बोलत होते. यावेळी बोलताना महायुतीच्या शपथविधीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, फडणवीस शपथ घेत आहेत यावर प्रतिक्रिया द्याव अस काही नाही आहे. राज्याचा निकाल धक्कादायक आला, त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. गावागावात मॉक पोल सुरू आहेत पण तिथे 144 लागू करण्यात आले आहे,असे राऊतांनी सांगितले.
advertisement
बहुमत असतानाही 13 दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. पण अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असे विधान करून राऊतांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले आहेत. त्यामुळे आता राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल,असे देखील राऊतांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे.
महायुतीकडून शपथविधीचे निमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना देण्यात आले आहे. या शपथविधीला उद्धव ठाकरे जाणार का? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना केला. यावर राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे जातील की नाही मी कस सांगू... मी दिल्लीत आहे. तसेच प्रोटोकॉल नुसार आमदार खासदार यांना निमंत्रण येत मला आल आहे अस समजा, असेही राऊतांनी सांगितले.
अजित पवार यांचं राजकारण वेगळ आहे. त्यांनी दिल्ली सोबत व्यवस्थित जुळून घेतलं आहे. त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्यामुळे पुढील ५ वर्ष राज्यात धुमशान बघायला मिळेल, असा टोलाही राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसेच सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन. एक प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच आरक्षण त्यांच्यासाठी ठेवलं आहे अस म्हणता येईल. त्यासाठी अनेकांचं योगदान आहे. उत्तम सहकार्य म्हणून अजित पवार यांनी काम केले आहे. उध्दव ठाकरे देखील अजित पवार यांचं नेहमी कौतुक करतात, असे संजय राऊतांनी सांगितले.
