संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही. पण अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत,ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले आहेत. पण असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार का? अजित पवारांवर दोन दिवसांपूर्वी 70 हजार कोटीचा आरोप केला होता. अशोक चव्हाणावर आरोप करतात, मग मग धनंजय मुंडेवर अन्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
advertisement
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत हे काही करून फायदा नाही. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात आहेत, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार. आता चारित्र्य म्हणजे काय हे आम्हाला वर जाऊन धर्म राजाला विचारावे लागेल, भगवद गीता बघावी लागेल, श्रीकृष्णाने अर्जुनाला अशी कोणती चारित्र्याची व्याख्या सांगितली आहेत का बघावे लागेल, असे राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत असतील तर स्वागत आहे. उद्योगपतीच्या विकासासाठी नाही.मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर, धारावीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली. आणि प्रधानमंत्री मणिपूरमध्ये कधी जाणार आहेत हा देखील प्रश्न आहे, दिल्ली निवडणुका झाल्या की त्यांनी जावे, असा सल्ला राऊतांनी मोदींना दिला.
दरम्यान महायुतीच्या बैठकीत आज इव्हीएमचे मशिन ठेवले पाहिजे, महापुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ते मशीन ठेवावे, मग या विजयाचे शिल्पकार मंचावर येतील,असा टोला देखील राऊतांनी लगावला.
