गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑपरेशन टारगरवर संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन टायगर, कमल होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झाला आहे. पण ते चुकीचं आकडा सांगत आहेत. त्यांनी सगळ्यांनाच आकडा घेतला पाहिजे. तसेच शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेडिक्स आहे... तो कधीही कापून टाकला जाऊ शकतो. त्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, असा चिमटाही राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.
advertisement
उदय सामंत काय म्हणाले?
मिशन हे सांगून राबविले जात नाही मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याकरिता मिशन राबविण्याची गरज नाही तर काही लोकांना कळून चुकलंय की बाळासाहेबांचे विचार नेणारी शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे... त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
