TRENDING:

... तर माझा कुणी बालही बाका करू शकत नाही, एकनाथ शिंदे यांच्यासमोर संतोष बांगर यांनी थोपटले दंड

Last Updated:

कावड यात्रेच्या समारोपादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंचावरून भाषण करताना आमदार संतोष बांगर यांनी आपले दंड थोपटून बलदंड बाहू दाखवून 'शक्ती'प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष खरात, प्रतिनिधी, हिंगोली: हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा दंड थोपटून 'शक्ती'प्रदर्शन केले आहे. यावेळी विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर दंड थोपाटून माझ्यामागे तुम्ही असल्यावर कुणी बालही बाका करू शकत नाही, असे ते म्हणाले.
संतोष बांगर (आमदार)
संतोष बांगर (आमदार)
advertisement

एकनाथ शिंदे यांच्यासमोर संतोष बांगर यांनी थोपटले दंड

कावड यात्रेच्या समारोपादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंचावरून भाषण करताना आमदार संतोष बांगर यांनी आपले दंड थोपटून बलदंड बाहू दाखवून 'शक्ती'प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. बांगर यांच्या कृतीने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

'लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही गद्दारी केली आता कसं होणार... परंतु ज्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे सारखा खंबीर नेता आहे त्याचा बालही बाका कोणी करू शकत नाही' असे उद्गार त्यांनी दंड थोपटून काढले आहेत.

advertisement

शिवसेना फुटीवेळी बांगर यांचा नाट्यमयरित्या शिंदेंच्या पक्षात प्रवेश

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा पक्ष सोडल्यानंतर आधी त्यांच्यावर टीका करून नंतर बांगर शिंदेसेनेत दाखल झाले. शिवसेनेत फूट पडण्याच्या काळात ठाकरे यांच्या पक्षात असताना अत्यंत भावुक होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संतोष बांगर ढसाढसा रडले होते. शिवसेनेतील बंडाळीच्या काळात निष्ठावंत म्हणून मिरवून घेतल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर त्यांनी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांना फोन करून पक्षात येण्याची विनंती केली.

advertisement

कोण आहेत संतोष बांगर?

संतोष बांगर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत

संतोष बांगर हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात

याधीही त्यांनी अशाच प्रकारे दंड थोपटले होते

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा पक्ष सोडल्यानंतर आधी त्यांच्यावर टीका करून नंतर बांगर शिंदेसेनेत दाखल झाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
... तर माझा कुणी बालही बाका करू शकत नाही, एकनाथ शिंदे यांच्यासमोर संतोष बांगर यांनी थोपटले दंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल