खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आहे. हा कराड धनंजय मुंडे यांचा निवटवर्तीय आहे. या कराडमुळे आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करायला सूरूवात केली. त्यात आज विधानसभा अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा जोरकसपणे उचलला होता.
advertisement
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला होता. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड काय बोलले मला माहिती नाही. पण पंकजा ताईंनी दसरा मेळाव्यात आकांची ओळख सांगितली होती. या प्रकरणात त्या असतील असं वाटत नाही मात्र आका असतील असं वाटतं. संतोष देशमुख मध्ये त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल, जर सोडली असेल तर आकांचे आका देखील जेलमध्ये जातील. आता आयजी त्यांचे आयओ असतील मग आका, चोका बाका कोणीही राहणार नाही, अरे सुरशे धस यांनी सांगितले.
सदनाचे नेते आणि मुख्यमंत्री जे बोलले ते मी वापरू शकत नाही. पण गृहविभाग आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करत ऑर्डर निघेल. जे नाव आपण घेतलं, आका म्हंटलं आहे तपासणीत पुढे आले तर ते बिनभाड्याच्या खोलीत नक्कीच जातील,असाही इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.
