संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबिय सध्या राज्यभर आक्रोश मोर्चे काढतंय. आज धाराशीवमध्ये या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाआधी देशमुखांची लेक वैभवी देशमुखने न्यूज 18 लोकमतशी बातचित केली आहे. यावेळी वैभवी देशमुखने हत्येचा तपासावर संशय व्यक्त केला.
पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही, तपास कसा सुरू आहे याची आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिले त्या पद्धतीने तपासून आम्हाला माहिती द्यायला हवी. पण आमच्यापासून काहीतरी लपवत जात आहे, असा संशय वैभवी देशमुखने व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गुन्हा दाखल केला असला तर ती चांगलीच गोष्ट आहे पण त्याचाही तपास लवकर व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंबीयांच्या सदस्यांनी केली आहे. यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झाले होते.
advertisement
दरम्यान या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, संतोष देशमुख यांची मुलगी म्हणते सीआयडी ने माहिती दिली नाही, यावर कुटुंबाला माहिती दिली पाहिजे असे माझं ही म्हणणं आहे,पारदर्शक तपास होतोय तर माहिती द्यायला हवी, असे सामंत यांनी सांगितले आहे.