पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एका पत्रकाराने, वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी खास आहेत, धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसाठी खास आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड विरोधात आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात कितीही पुरावे दिले तरी त्यांचा राजीनामा अशक्य आहे, असं ट्विट संदिप क्षीरसागर यांनी केल्याचा सवाल केला होता.यावर पंकजा मुंडे यांनी मी काहीच पाहत नाही, मी तुमचं ऐकूण घेते, मी काय बोलू,अशी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री देखील आहेत. त्याच्याकडच्या डिपार्टमेंटच्या आमच्या जिल्ह्याशी संबंधित काही विषयांसदर्भात अधिवेशन काळात वचन दिले होते. त्या बैठका घेईन. त्यापद्धतीने त्यांनी डीसीसी बॅकेच्या बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये नाशिक, बीड आहे. या बैठकीसाठीच त्यांनी मला बोलावले होते. त्यामुळे जाऊ डीपीसीला, मी पण पाच वर्षांने चालले आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे राजीनाम्यावर काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. माझ्या राजीनाम्यामुळे सगळ्या गोष्टी सुटणार असतील तर राजीनामा देईल. माझा दोष वरिष्ठांनी सांगावा. माझी नैतिकता लोकांबद्दल प्रामाणिक आहे, मी आतापर्यंत प्रामाणिक भूमिका मांडली असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत मला टार्गेट करण्यात आले असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
