TRENDING:

वाल्मिक कराडचं आता खरं नाही; खंडणी,अपहरण,हत्या अन्..., संतोष देशमुख प्रकरणात आरोप निश्चित

Last Updated:

संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. तसेच वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना धक्क बसला असून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहे.

advertisement

आरोपींवर नेमके कोणते आरोप निश्चित केले?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड , विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे , महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिवीगाळ, कंपनीचे नुकसान अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित केले आहेत. यात पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे वाल्मिक कराड सर्व आरोपींना धक्का समजला जात आहे.

advertisement

विशेष सरकारी वकील उज्वल निकम नेमकं काय म्हणाले? 

विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की, आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होईल. आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फोर डीरेल केले गेले. प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच तीच कारणे न्यायालयात मांडली जात होती. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

advertisement

या अगोदर बीड न्यायालयाने वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज आणि दोष मुक्ती अर्ज फेटल्यानंतर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या निकालाविरोधात वाल्मीक कराड यांनी अपील केला होता. यावर हायकोर्टानेही वाल्मिकी कराड यांचा जामीन अर्ज फेटाळला. दोष आरोप निश्चितीला स्थगिती द्या असा अर्ज केला होता मात्र मान्य हायकोर्टाने तो आदेश फेटाळला.

धनंजय देशमुख काय म्हणाले? 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झाल्याने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना शिक्षा होऊन देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आरोपींकडून विलंब करण्याचा प्रयत्न केला मात्र आज न्यायालयाने चार्ज फ्रेम केला. आरोपींनी सर्व प्रयत्न केले होते त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही पश्चाताप दिसून येत नाही.. त्यांचे बोलण्याची भाषा देखील तशीच आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मिक कराडचं आता खरं नाही; खंडणी,अपहरण,हत्या अन्..., संतोष देशमुख प्रकरणात आरोप निश्चित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल