संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील एक संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला उशिरा रात्री सीआयडीने कोर्टात हजर केले असता त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात अजूनही या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं.
advertisement
ग्रामस्थांच्या या जलसमाधी आंदोलनात महिला, वयोवृद्ध आणि लहानग्यांनी सहभाग घेतला होता. या जलसमाधी आंदोलना दरम्यान एका महिलेला अचानक चक्कर आली होती. प्रभावती भिमराव सोळंके असे या चक्कर आलेल्या महिलेचे नाव होते. त्यानंतर तत्काळ त्या महिलेला नदीच्या किनाऱ्यावर आणून शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण महिलेला शुद्धच आली नसल्याने तिला पोलिसांच्या गाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान या घटनेनंतरही ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दहा दिवसात आरोपींना अटक करू असा ग्रामस्थांना शब्द दिला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाला स्थगिती दिली.
