बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. या प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या अनेक नेते आणि आंदोलनकर्ते भेटून त्यांचं सात्वन करत आहेत.यासोबत या प्रकरणातील मास्टरमाईंडच्या अटकेसाठी सरकारवर दबाव टाकतायत. अशात आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सात्वन पर भेट घेतली आहे.
advertisement
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले की, कोण आहे वाल्मिक कराड सरकार पेक्षा मोठा आहे का? संविधानाने कायद्यापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात आत नाही टाकला तर पुन्हा आंदोलन करणार, त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका, असे आबासाहेब पाटील यांनी सरकारला ठणकावुन सांगितलं आहे.
तसेच महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर दोन दिवसात सर्व आरोपी अटक करा, असा अल्टीमेटम त्यांनी सरकारला दिला आहे. 36 जिल्ह्यातील सर्व संघटना मराठा एकत्रित झालेले आहेत.आमचे सरकारला एवढेच म्हणणं आहे. एसपीची बदली करून चालणार नाही, पोलीस प्रशासनाचा जाळ तोडावा लागेल कलेक्टर तहसीलदार हे रॅकेट आहेत तोडलं पाहिजे. त्यामुळे महिन्याच्या आत मर्जीतील्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
