शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांचे अपहरण ज्या स्विफ्ट गाडीतून झाले, ती गाडी कुणाची? खंडणीमधील आरोपी (वाल्मिक कराड) कोणाच्या घरात लपले होते? या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील, असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.
परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची प्रवृत्ती झालीय. त्यामुळे इतर आरोपींना सुद्धा मोकोका लावावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. त्याचसोबत उज्ज्वल निकम जर होकार देत नसतील तर सतीश माने- शिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्या, असे देखील सोनवणे यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान कालपासून बीडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू आहेत. हे असताना आंदोलन कसं झालं?
गुंड प्रवृत्तीचे लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच 100 टक्के मी अमित शाह यांची भेट घेतली होती. मी त्यांना सगळे वृत्तांत देणार आहे,असे सोनवणे यांनी सांगितले.
मी जर वाल्मिक कराड यांना धमकी दिली तर मग एवढे दिवस का लागले बोलायला? गुंडा राज होतं, आमच्या लोकांना मारायचा प्लॅन होतो. अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार? गुन्हेगाराला कुठली ही जात नसते, काही मूठभर समाज कंटक आहेत ज्यांना जातीय रंग द्यायचा आहे. अजित दादांनी बीड मध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला का काय असं वाटतंय. संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात जे जे आहेत जे कोणी सामील असेल या सर्वांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी दिली.
