बीडच्या मोर्च्याला संबोधित करताना प्रकाश सोळंके म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या होऊन 19 दिवस उलटलेत तरी अद्याप आरोपी मोकाट आहेत. खंडणीतले आरोपी वाल्मिक कराडला सुद्धा अटक झालेली नाही, त्यांना अटक झाली पाहिजे, असे सोळंके यांनी म्हटले आहे.
गेल्या 5 वर्षांपैकी 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि या ठिकाणी पंकजा मुंडेंनी सांगितलं, धनंजय मुंडेंनी त्याचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं, कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार वाल्मिक कराडला मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनावर आणि प्रशासनावर आपली जरब बसवली,असा आरोप प्रकाश सोळंखे यांनी केला.
advertisement
हा (वाल्मिक कराड) फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचा, याचा उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा, हजारो निरपराध लोकांवर खटले दाखल केले गेले. गोदावरी निधीतीन 300 हायवा वाळूचा उपसा करतात. कुणाच्या आहेत या हायवा? ज्यांनी या वाल्मिक कराडच्या मागे ही मोठी शक्ती उभी केली. ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास या केसमध्ये न्याय मिळणार नाही. त्यामुळे जो पर्यंत या केसचा निकाल लागतं नाही, तो पर्यंत त्यांचं (धनंजय मुंडे) मंत्रिपद काढून घ्यावं आणि निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, अशी मागणी मी बीड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी करतो,असे सोळंखे यांनी सांगितले.
