आमदार संदीप क्षीरसागर न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड यांना अटक का होत नाही? असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला.तसेच कराड यांना धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्यानंच तो मोकाट असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
धनंजय मुंडे स्वत: च म्हणतात ते (वाल्मिक कराड) माझे निकटवर्तीय आहेत. आणि अशा परिस्थितीत बीड जिल्हा आणि त्यांच्या सत्तेतले आमदार त्यांच्यावर (वाल्मिक कराड) आरोप करतायत. मग खरं खोट काय हे तपासण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या (धनंजय मुंडे) या मंत्रिपदामुळे ते मोकाट राहिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्याच पाठबळामुळे हे सगळं होत असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय.
advertisement
मी या प्रकरणात शांत बसणार नाही.जो पर्यंत त्या वाल्मिक कराडला अटक होत नाही.देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत मी शांत बसणार नाही,अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणात जर न्याय मिळाली नाही तर आम्ही कुटुंबियांशी बोलून आणि सगळे नेतेमंडळी जमून पुढील दिशा ठरवू, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. शहरात सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहेत. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
