संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मिळण्यासाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना देशमुखांची लेकीचा अश्रूंचा बांध फुटला होता. स्वातंत्र्य असताना आपण न्याय काय मागायचा? असा सवाल करत वैभवी म्हणाली की, संविधान लिहले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला जे थोर विचार दिलेत.त्या विचारावर आज आपण चाललो असतो तर आज ही गुंडगिरी वाढलीच नसती. आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. त्यांच्या अंगोदर अनेकांची हत्या झाली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना हा अन्याय दूर करून सर्वांना न्याय मिळवून द्यायचा आहे, असे वैभवी म्हणाली.
advertisement
माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला, त्याविरूद्ध मी तुमच्याकडे न्याय मागतेय. माणुसकीच्या नात्याने तुम्ही सर्व आज एकत्र आलात.न्यायाची भूमिका घेतलीत. आमच्या पाठिमागे उभे राहिलात,आमच्या कुटुंबासोबत उभे राहिलात. तसेच तुम्ही आमच्यासोबत कायम राहा,अशी भावनिक साद घातली.
कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांनाच SIT मध्ये घेणार
दरम्यान संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. संतोष देशमुखांची आई, पत्नी, मुलगी, मुलगा उपस्थित होते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होते.बीडमधील गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही. तसेच कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांनाच SIT मध्ये घेणार, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, अधिवेशनात सांगितले होते तेच आता आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे की गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही. या प्रकरणाबाबत आम्ही चर्चा केली आहे. आमच्याकडे काही गोष्टी होत्या त्या दाखवल्या आहेत. आम्हाला न्याय पाहिजे आम्ही सांगितले आहे. आम्ही न्यायाची भूमिका मांडली आहे.
