बजरंग सोनवणे बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या भावाला कुणा-कुणाचा फोन आला? पोलीस स्टेशनला बनसोड नावाच्या पीआयला कुणाचा फोन आला? बनसोडला कुणाला फोन आला? महाजन साहेबांना कुणाचा फोन आला? पाटील कुणाच्या संपर्कात होते? तुम्हाला खरा तपास करायचाय ना, तर या तिघांचा सीडीआर काढा,अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
advertisement
तसेच या प्रकरणात खंडणीचा गुन्हा आधी दाखल होतं नाही, नंतर 10 तारखेला दाखल होतो.त्यातही स्वत: एसपींना येऊन गुन्हा दाखल करावा लागतो. त्यामुळे ही कोणाची दहशत आहे? हे सुद्धा शोधणे गरजेचे आहे.तसेच या प्रकरणात 4 आरोपींना अटक झालीय, उर्वरित आरोपी कधी पकडणार? 15 दिवस झाले तरी 3 आरोपीचा का अटक झाली नाही? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तसेच या तीनही केसेस सीआयडीकडे तपासणीसाठी वर्ग कराव्यात, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
स्व: मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी जे केलं होतं ते फडणवीस यांनी करून दाखवावं आणि ही गुन्हेगारी मोडीत काढावी, असे आव्हान सोनवणे यांनी गृहमंत्र्यांना दिलं आहे. तसेच गृहमंत्री यांनी तपास आता कुठपर्यंत पोहोचला याची देखील माहिती द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी रेली आहे. तसेच येत्या 28 डिसेंबरच्या मोर्चात मी सहभागी होणार आहे.जर या प्रकरणात न्याय नाही मिळाला तर मी उपोषणालाही बसेन, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.
