बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन,तोच निर्णय व्हायचा. बीडने अनेक खून पाहिले, अनेक खून पचाविले पण संतोष देशमुखच्या खुणा नंतर जी वाचा फुटली त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. सरकारला देखील हालचाल करावी लागली सरकारला असे खून वाचवायचे सवय आहे,असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.
advertisement
तसेच सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या त्यांचा वावर पाहता या प्रकरणात खरोखर न्याय मिळेल का अशी शंका आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.तसेच फडणवीस म्हणतात की कोणालाही सोडणार नाही पण फडणवीस आणि कुणाला कधी सोडले आणि कसं अडकवले याची एक एसआयटी नेमली पाहिजे. गेल्या काही काळामध्ये फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे .रक्ताचे डाग धून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे आणि त्यांच्या आक्रोश किंकाळ्या दाबल्या आहेत.. किती जणांना अडकविला आहे याची एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतः त्यांचे रिपोट घ्यायला पाहिजे, असा चिमटा राऊतांनी फडणवीसांना काढला आहे.
कराडला अटक केली पण हाच खटला बीडमध्ये चालवला जातोय. जसे शहाबुद्दीन केस आहेत राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा खटला बाहेर चालला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी देखील तपास बीड जिल्ह्याबाहेर नेण्याची मागणी केली आहे. राज्याचा वरिष्ट्ठ अधिकारी यात असेल पाहीजे. ज्या भागातले पोलिस आरोपी बरोबर उठबस करतात त्याठिकाणी तपास योग्य होऊ शकत नाही,असा संशय अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. वाल्मिक कराडचा फोन पोलिसांनी जप्त केला त्याचा सीडीआर जारी केला पाहीजे. व्हिडीयोज काय? तीन तासात काय झाले हे कळले पाहीजे. एसआयटीमध्ये तरबेज अधिकारी घेऊन बीड जिल्हयाबाहेर राबविली पाहीजे,अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
