भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला आहे. यामुळे सीआयडी तपास करण्याची संधी मिळणार आहे. रात्रीच या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या एसआटीवर मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे,अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. आयजीच्या मार्गदर्शानाखाली या घटनेचा सखोल तपास होणार असून न्यायालयीन तपासही होणार आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण मनावर घेतले असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खोटं निवेदन दिल्याचा आरोप होतोय.यावर बोलताना धस म्हणाले, मुख्यमंत्र्यांसारखे अतिशय सकारात्मक निवेदन कुणी केले नाही. एका दिवसात एसपी हलवला, गुन्हेगारांवर मोकोका लावणार असे सांगितले आहे. कायदा नावाची काही गोष्ट बीड जिल्ह्यात राहिली नाही. जी लोकं बीड जिल्ह्याचे पालक स्वतःला म्हणून घेत होती ते गँग ऑफ वासेपूरला बळ देत होती, अशी बोचरी टीका धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर केली.
सीआयडी हे सर्व आरोपींच्या मागे आहेत. त्यांना लवकरच अटक होईल, विष्णू चाटेने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता त्यांच्या मेन 'आका' (वाल्मिक कराड) हे देखील 302 चे सूत्रधार आहेत असे मला वाटत आहे. त्यामुळे खंडणीसह त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
परळी तालुक्यात अराजकता दहशत काय हे जाऊन बघातल पाहिजे. तेथील उद्योजकांकडे कोणतीही एजन्सी राहिली नाही. तंबाखू चुन्याच्या एजन्सी सुद्धा पळवले आहेत.. लोक परळी मध्ये राहायचं नको म्हणून आंबेजोगाई आणि पुण्याला राहायला चालले आहेत. त्यामुळे आगामी काळात अन्याय झाला तर मी परळीमध्ये सुद्धा जाणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं.
