पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. त्यामुळे मी या आधीही म्हणालो होतो तपास व्यवस्थित सुरू आहे. मात्र सर्व आरोपी पुण्यातच का सापडत आहेत? कुणीतरी त्यांना आश्रय देणारा असेल? असा संशय व्यक्य करत धनंजय देशमुख यांनी त्या आश्रय दात्याला ही शोधलं पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यासोबत तिसरा आरोपी सुद्धा लवकरच सापडेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले प्रमुख आरोपी आहे तर सुधीर सांगळे हा सहआरोपी आहेत.या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. सरपंचाची हत्या केल्यानंतर तब्बल 25 दिवसांनी हे आरोपी फरारी होते. अखेर त्या तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोन आरोपी भिवंडीनंतर पुण्यात गेले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली आहे. यासोबत संतोष देखमुख यांचं लोकेशन देणारा एक संशयितही पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.
परभणीत आज महामोर्चा
दरम्यान मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरूंना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह, बीड लोकसभा खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक नेतेमंडळी ही राहणार उपस्थित राहणार आहेत.
