मृत सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाला आलेले हार, पुष्पगुच्छ आणि गिफ्ट वडिलांसमोर ठेवताना भावूक झाली. काल निकाल आणि वाढदिवस असल्याने वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. राज्यभरातून तिच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक भागातून तिला पुष्पगुच्छ आणि गिफ्ट पाठवण्यात आलेले आहेत. तसेच वाढदिवसाच्या दिवशी वडिलांचे मासिक घालावे लागते हे जगातील सर्वात मोठे दु:ख असल्याचे वैभवी म्हणाली.
advertisement
वाढदिवसाच्या दिवशी वडिलांचे पाचवे मासिक
वैभवी देशमुख म्हणाली, माझा वाढदिवस असताना मला आज वडिलांचे मासिक घालावे लागत आहे हे जगातलं सर्वात मोठे दुःख आहे. अनेकजण वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, गिफ्ट देत आहेत पण मनातून ते घेण्याची इच्छा नाही. वडील माझ्यासोबत असते तर त्यांच्या आशीर्वादाची थाप पाठीवर पडले असती. मला आज आलेले जे गिफ्ट आहेत ते मी वडिलांच्या चरणी अर्पण केलेत.
हात जोडून पाया पडून विनंती करते की माझ्या वडिलांना....
गेल्या वर्षीचे त्यांच्यासोबतचे माझ्या वाढदिवसाचे फोटो पाहून दुःख होतंय. माझे वडील मला परत आणून देऊ शकत नाहीत म्हणून या महाराष्ट्राकडे मी हात जोडून पाया पडून विनंती करते की माझ्या वडिलांना फक्त तुम्ही लवकरात-लवकर न्याय मिळवून द्या, असे वैभवी देशमुख म्हणाली,