TRENDING:

मध्यरात्री 1.30 वाजता हॉटेलमध्ये चेक इन अन् संध्याकाळी आढळली डेड बॉडी; महिला डॉक्टरचा अखेरच्या 10 तासाचा घटनाक्रम

Last Updated:

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे समोर आहे. टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर अखेरच्या दहा तासात काय काय घडलं हे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : सातारा येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर अनेक मोठ-मोठे खुलासे होत आहेत. आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी गोपाळ बदने आणि महिलेचे घर मालक प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोघे जणं फरार असल्यामुळे पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरू तर त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 Satara Doctor Case
Satara Doctor Case
advertisement

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे समोर आहे. गेल्या 8 महिन्यांपासून महिला डॉक्टर या बनकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. 23 तारखेला पहाटे 1.30 वाजता डॉक्टर महिलेने फलटण येथील हॉटेल मधूदीप मध्ये "चेक इन"केलं . तसेच त्यांनी हॉटेलची रूम दोन  दिवसांसाठी बुक केली. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना महिला डॉक्टसोबत कोणी नव्हतं.

advertisement

पोस्टमार्टममध्ये काय आलं? 

दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे 23 तारखेला संध्याकाळी 4  वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले. पोलिसांनी हाताची मूठ उघडल्यानंतर हातावर लिहिलेला मजकूर समोर आला. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टक महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला आङे. मृत्यूपूर्वी कुठला ही जखमा किंवा व्रण शरीरावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

बनकर यांच्याकडे ८ महिन्यापासून भाडेकरू

प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तर मदने हा फलटण ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे . महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारी पासून १५७ पेक्षा अधिक कॉल झाल्याचे समोर आला आहे.आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल झाले आहेत. मूळच्या बीडच्या असलेल्या महिला डॉक्टर या बनकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून ८ महिन्यापासून राहत होत्या. महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सॲप कॉल डिलिट केल्यामुळे डॉक्टर यांच्या मोबाईलमधील मेसेज पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सायबर तज्ञांकडून आहे.

advertisement

कुटुंब शेतकरी, परिस्थिती हलाखीची  जिद्दीनं झाली मेडिकल ऑफिस

डॉक्टर तरुणी ही गावची रहिवासी असून तिचे वडील हे शेतकरी आहे. महिला डॉक्टर कुटुंबातली सर्वात मोठी मुलगी होती.जळगावच्या मेडिकल कॉलेजमधून तीने एमबीबीएस केलं.एमबीबीएसनंतर महाबळेश्वरला 6 महिने सेवा दिली.त्यानंतर गेल्या वर्षभरापासून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत होती.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गोपाळ बदनेला सेवेतून निलंबित केलंय.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

सातारा डॉक्टर प्रकरणी सनसनाटी खुलासा; 8 महिन्यापासून ओळख,157 पेक्षा अधिक कॉल; महिला डॉक्टरला आत्महत्यापूर्वी कोणाचा फोन?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री 1.30 वाजता हॉटेलमध्ये चेक इन अन् संध्याकाळी आढळली डेड बॉडी; महिला डॉक्टरचा अखेरच्या 10 तासाचा घटनाक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल