TRENDING:

कोर्टाचे आदेश- गर्भपात करा, पण बाळ जिवंत जन्मलं, सातारा रुग्णालयाने उपासमार करून मारलं, आईचा धक्कादायक आरोप

Last Updated:

Satara News: जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यासाठी विनवणी करूनही रुग्णालयाने त्याला दूध पाजू दिले नाही, रुग्णालयाने निर्दयीपणाने त्याला मारून टाकले, असा धक्कादायक आरोप मृत बाळाच्या आईने रुग्णालय प्रशासनावर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या बाळाला १२ तास उपाशी ठेवून सातारा जिल्हा रुग्णालयाने मारून टाकल्याचा धक्कादायक आरोप मृत बाळाच्या आईने केला आहे. यासंदर्भात बाळाच्या आईने कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे यासदंर्भात आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून असे काही घडले नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले.
सातारा रुग्णालय
सातारा रुग्णालय
advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात मृत बाळाची आई आणि कुटुंबियांनी याचिका दाखल केली आहे. जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यासाठी विनवणी करूनही रुग्णालयाने त्याला दूध पाजू दिले नाही, रुग्णालयाने निर्दयीपणाने त्याला मारून टाकले, असा धक्कादायक आरोप मृत बाळाच्या आईने रुग्णालय प्रशासनावर केला आहे.

बाळाला १२ तास उपाशी ठेवले

कोर्टाचा आदेश असल्याने तुम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, असे मृत बाळाच्या आईने म्हटले. मी त्यांना बाळाला दूध पाजण्यासाठी सांगत होते, विनवणी करीत होते, मात्र सातारा सरकारी रुग्णालय माझ्याशी आणि बाळाशी अत्यंत निर्दयीपणाने वागले. १२ तास उपाशी ठेवून लेकराची उपासमार करीत त्याला मारले, असा आरोप मृत बाळाच्या आईने केला.

advertisement

संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यंत्रणेवर गुन्हा दाखल करून मृत बाळाच्या आईला मानसिक धक्का बसल्याने १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खंडपीठातील याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून सातारा प्रकरणाची गंभीर दखल

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने लगोलग या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी २५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर होणार आहे.

advertisement

रुग्णालय प्रशासनाने मृत बाळाच्या आईचे आरोप फेटाळले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

महिलेच्या गर्भपातासंदर्भात आम्हाला न्यायालयाने निर्देश दिले होते. महिलेची काळजी घेऊन आम्ही त्यांच्यावर उपचार केले. महिला सुस्थितीत असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांनी गैरसमजातून कुठलीशी तक्रार केली आहे असे ऐकण्यात आले, असे सातारा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक युवराज करपे म्हणाले. तसेच महिलेने केलेल्या आरोपांचे त्यांनी अप्रत्यक्षपणे खंडन केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोर्टाचे आदेश- गर्भपात करा, पण बाळ जिवंत जन्मलं, सातारा रुग्णालयाने उपासमार करून मारलं, आईचा धक्कादायक आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल