TRENDING:

साताऱ्यातील प्रसिद्ध शाळेत 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ

Last Updated:

सुरुवातीला तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची नोंद झाल्यानंतर तपासामध्ये 24 मुलांवर लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : देशात नावाजलेल्या साताऱ्यामधील एका शाळेमध्ये मुलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे.
सातारा पोलीस स्टेशन
सातारा पोलीस स्टेशन
advertisement

सुरुवातीला तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची नोंद झाल्यानंतर तपासामध्ये 24 मुलांवर लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, इतकी कमाई
सर्व पहा

याप्रकरणात ७ तारखेला सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका नामांकित शाळेतील केअर टेकर मुलांचा लैंगिक छळ करीत होता. काही बालकांनी तक्रार केल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तो मुलांना बॅडटच करीत होता, तसेच त्यांना मारहाण करणे, पैसे मागणे अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या. आधी आमच्याकडे ३ तक्रारी आल्या होत्या, आता आमच्याकडे एकूण २४ तक्रारी आलेल्या आहेत. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता ११५/२, ३५१/२ तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करून चौकशी करीत आहोत, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नसून लैंगिक छळाचा आरोप असल्याने न्यायालयाने त्याला जामीन दिल्याचे अधीक्षक दोषी यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्यातील प्रसिद्ध शाळेत 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल