TRENDING:

'ड्युटी संपली अन् हॉटेलमध्ये गेली', हातावर सगळं लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; काकाने टाहो फोडला

Last Updated:

पीएसआय गोपाल बदनेने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टर महिलेने केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा :   साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरगळफास घेत आत्महत्या केली. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने  सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये पीएसआय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केला. बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केला. तसंच  घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानंही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
satara news doctor
satara news doctor
advertisement

दरम्यान खासदाराच्या पीएमार्फत शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी दबाव टाकण्याच्या त्रासाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं संपदाच्या नातेवाईंकांनी सांगितल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. आपल्या हातावर संपदानं सुसाईड नोट लिहिल्यानं केवळ वैद्यकीय क्षेत्र नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरलंय. या आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतलीय. त्यांनी तातडीनं संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

advertisement

महिला डॉक्टरचे काका काय म्हणाले? 

महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिला डॉक्टरचे काका म्हणाले, माझी पुतणीने काल अचानक आत्महत्या केली. आम्हाला तिने काही न सांगता हॉटेलमध्ये गेली. ड्युटी संपल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. ती आम्हाला मधून मधून सांगायची की रिपोर्ट बदलण्यासाठी मला अधिकारी त्रास देतात , मला त्रास झाला तर मी आत्महत्या करेल असे ती म्हणाली होती. पोस्टमार्टम करताना त्रास द्यायचे म्हणून तिने सांगितले होते.

advertisement

महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये काय होतं?

माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने, ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला.

कुटुंबीयांचा काय आरोप आहे? 

या घटनेने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नाही तर स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेतही गंभीर चर्चा सुरू केली आहे. आत्महत्येनंतर मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून, त्यात दोन व्यक्तींवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ करण्याचे गंभीर आरोप आहेत. कुटुंबीयांचा दावा आहे की, मृत डॉक्टरवर काही महिन्यांपासून राजकीय नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून दबाव निर्माण केला जात होता. त्यांच्या अनुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करताना किंवा वैद्यकीय तपासणी करताना इच्छित प्रकारे रिपोर्ट तयार करण्याचा दबाव डॉक्टरवर राहिला, ज्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.

advertisement

जूनमध्ये देखील केली होती तक्रार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या मदतीला शिवार, दिला मानसिक आधार, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

जूनमध्ये केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने 13 ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा माहिती अधिकार टाकून डीवायएसपी कार्यालयाकडून ऑफिसकडून माहिती मागवली. मात्र, तपासात कोणतेही सहकार्य होत नसल्याने आणि शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याने डॉ. संपदा मुंडे यांनी अखेर टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ड्युटी संपली अन् हॉटेलमध्ये गेली', हातावर सगळं लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; काकाने टाहो फोडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल