या सगळ्या घडामोडीनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली. आरोपीने सर्व पुरावे नष्ट करून मग पोलीसांकडे सरेंडर केलं, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एवढंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मयत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला, असा खळबळजनक दावाही कुटुंबीयांनी केला.
advertisement
कुटुंबीयांचा नेमका दावा काय?
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी आता नवा आणि गंभीर दावा केला आहे. डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी आले. मात्र कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता.
दरम्यान, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच, कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केला आहे की, मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा, तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
कुटुंबीयांच्या या नव्या दाव्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. तूर्तास दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. मयत तरुणीसह इतर आरोपींचे देखील सीडीआर काढण्यात आले आहे. मयत तरुणी आणि आरोपीचे एकत्रित लोकेशन्स आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत.
