जुन्या जलवाहिनीमुळे वारंवार त्रास
1986 पासून सुरू असलेल्या कास पाणीपुरवठा योजनेत 1997 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. मात्र, अजूनही जुनी जलवाहिनीच वापरली जात आहे. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे आटाळी आणि कासाणी गावाजवळ या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने नवीन जलवाहिनीचे काम गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
advertisement
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
बुधवार, 6 ऑगस्ट : कास योजनेच्या माध्यमातून पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा आणि कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहील.
गुरुवार, 7 ऑगस्ट : पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडी टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी आणि कोटेश्वर टाकीतून होणारा सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी पाणी येणार नसल्याने नागरिकांना पाण्याची बचत करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा : सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ! शेतकऱ्यांना दिलासा, सध्याचा बाजारभाव काय?
हे ही वाचा : रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली! पाऊस कमी असला तरी धरणे तुडुंब, 81 टक्के पाणीसाठा!