TRENDING:

Satara Crime : 'दिवाळीला मला न्यायला येऊ नका...', महिला डॉक्टरने एक दिवस आधी वडिलांना केला होता कॉल! 'कुणीतरी पोलिस अधिकारी मला...'

Last Updated:

Satara Women Doctor Case : साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने स्वत:चं आयुष्य संपवण्याआधी वडिलांना फोन केला होता. त्यावेळी नेमकं काय बोलणं झालं? याचा खुलासा तिच्या काकांनी केलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Satara Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर अनेक मोठ-मोठे खुलासे होत आहेत. आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे महिला डॉक्टरच्या भावाने तिच्यावर रिपोर्ट बदलण्याचा दबाव होता, असा आरोप केला आहे. अशातच आता महिला डॉक्टरांच्या काकांनी मोठी माहिती दिलीये.
Satara Women Doctor Case
Satara Women Doctor Case
advertisement

पप्पा, दिवाळीला मला न्यायला येऊ नका...

महिला डॉक्टर नियमितपणे वडिलांशी बोलत होती, मात्र तिने कधी वडिलांना मनातली सगळी गोष्ट सांगितली नाही. कुणीतरी पोलिस अधिकारी त्रास देत असल्याचे ती सांगत होती, असं तिच्या काकांनी सांगितलं आहे. काकांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 व 22 ऑक्टोबरला महिला डॉक्टर वडिलांशी बोलली होती. तेव्हा मला सुटी मिळत नाही. कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे दिवाळीला मला न्यायला येऊ नका. मी 8 दिवसांनी येईन, असं ती म्हणाली होती. मात्र ती घरी आली तर चार खांद्यावरच..!

advertisement

उच्च पदस्थ अधिकारी फलटणमध्ये दाखल

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी फलटण येथे दाखल झाले असून, सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी, तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी पोलिसांवर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

घटनेच्या दिवशी काय घडलं?

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे समोर आहे. गेल्या 8 महिन्यांपासून महिला डॉक्टर या बनकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. 23 तारखेला पहाटे 1.30 वाजता डॉक्टर महिलेने फलटण येथील हॉटेल मधूदीप मध्ये "चेक इन"केलं . तसेच त्यांनी हॉटेलची रूम दोन दिवसांसाठी बुक केली. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना महिला डॉक्टसोबत कोणी नव्हतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

दरम्यान,  दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे 23 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले. पोलिसांनी हाताची मूठ उघडल्यानंतर हातावर लिहिलेला मजकूर समोर आला. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टक महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला आङे. मृत्यूपूर्वी कुठला ही जखमा किंवा व्रण शरीरावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Crime : 'दिवाळीला मला न्यायला येऊ नका...', महिला डॉक्टरने एक दिवस आधी वडिलांना केला होता कॉल! 'कुणीतरी पोलिस अधिकारी मला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल