मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भोसलेचा प्रशांत चव्हाण हा साडू आहे. सतीश भोसले याचा साडू प्रशांत चव्हाण उर्फ गब्या याने आणि त्याच्या साथीदारांनी पाथर्डी शहरागत असलेल्या जमिनीवर ताबा मारला होता. त्या जमिनीचा आणि पारधी समाजाचा कुठलाही संबंध नसल्याने जमिनीच्या पुढल्या बाजूस या लोकांनी पाल ठोकली होती. त्यानंतर तसे पक्के बांधकाम केले. ते अतिक्रमण हटवायचे असेल तर एक कोटी रुपयांची मागणी या चव्हाणने केली होती.
advertisement
कुणाची होती ही जमीन?
अजिनाथ खेडकर आणि विष्णू ढाकणे यांनी पाथर्डी शहरात शेवगाव - कोरडगाव रोडवरील गट नंबर 77/1 पैकी 23 गुंठे जमीन घेतली होती. जमीन पाण्यासाठी गेल्यानं तिथे काही पारधी समाजाच्या लोकांनी गट नंबरच्या रोडच्या साईटला अतिक्रमण केल्या दिसून आलं. त्यावेळेस त्यांची बाचाबाची झाली हे प्रकरण मिटवण्यासाठी चिरून तालुक्यातील खोक्या उर्फ सतीश भोसले यालाही बोलवण्यात आलं. जमिनीचे मालक आणि खोक्यात बैठक झाली. त्यानंतर खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण याने जमीन मालकांना एक कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणात अजिनाथ खेडकर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण मिटवण्यासाठी सतीश भोसले यानेही मध्यस्थी केली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सतीश भोसले आणि प्रशांत चव्हाण हे दोघेही साडू आहेत. दोघांचेही ताजमध्ये आणि इतर ठिकाणी फिरायला केल्याचे फोटो आहेत. तर सतीश भोसले हा आलिशान एसयुव्ही गाडी वापरतो तर प्रशांत भोसले हा इनोव्हा गाडी वापरतो. या दोघांचा कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर आला आहे. यांचा सिंडिकेट असल्याचा आरोप ही सध्या होत आहे.