TRENDING:

'शककर्ते शिवराय' कार विजयराव देशमुख यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated:

ओजस्वी, रसाळ शैलीतून त्यांनी आजवर दहा हजारांहून अधिक शिवचरित्र व्याख्याने संपूर्ण देशभरात दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सुप्रसिद्ध शिवकथाकार आणि धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
News18
News18
advertisement

छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्राची अस्मिता, देदीप्यमान इतिहास आणि उज्ज्वल भविष्याचे बीज सामावले आहे. अशा या लोकोत्तर महापुरुषाच्या चरित्राचे कथन करणं हे शिवधनुष्य उचलण्याइतकं कठीण कार्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी 'शककर्ते शिवराय' या ग्रंथाच्या माध्यमातून केले. विजयराव देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

शेतकरी कुटुंबात जन्म

विजयराव देशमुख यांच्या निधनाने छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ आज निखळला आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात आणि गाडेगाव सारख्या लहान खेड्यात जन्मलेल्या विजयरावांनी अवघ्या 10 व्या वर्षापासून शिवकार्यास सुरूवात केली होती. आपल्या ओजस्वी, रसाळ शैलीतून त्यांनी आजवर दहा हजारांहून अधिक शिवचरित्र व्याख्याने संपूर्ण देशभरात दिली. सतत 18 वर्षे त्यांनी शिवदुर्ग दर्शन यात्रेचे आयोजन करुन हजारो शिवभक्तांना दुर्गभ्रमंती देखील घडवली.

advertisement

'शककर्ते शिवराय` सर्वाधिक विश्वासार्ह शिवचरित्र 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

'शककर्ते शिवराय` हे शिवछत्रपतींचे द्विखंडात्मक चरित्रग्रंथ सर्वाधिक विश्वासार्ह शिवचरित्र म्हणून ओळखले जाते. सगळ्याच इतिहास संशोधकांनी सत्यकथन करणारे प्रमाणित शिवचरित्र असा या ग्रंथाचा गौरव केला आहे. 1980 मध्ये शिवरायांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथीला शककर्ते शिवराय हा ग्रंथ छत्रपती शिवरायांच्या समाधीवर अर्पण करण्यात आला होता. चांदीच्या पालखीत शिवरायांसमवेत या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शककर्ते शिवराय' कार विजयराव देशमुख यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल