TRENDING:

कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावांतून 'शक्तिपीठ' महामार्ग जाणार! यादी आली समोर, तुमच्याही गावाचा समावेश आहे का?

Last Updated:

Shaktipeeth Mahamarg : राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यातील अनेक भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यातील अनेक भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा सुमारे 856.76 किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. या मार्गात 13 जिल्हे आणि 40 तालुक्यांचा समावेश असून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक गावे या महामार्गाच्या कक्षेत येणार आहेत. प्रकल्पांतर्गत विविध नद्यांवर पूल तसेच डोंगराळ भागात घाटमार्ग उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth Mahamarg
advertisement

शेतकरी आंदोलनानंतर आराखड्यात बदल

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बागायती शेती बाधित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता. या आंदोलनाची दखल घेत शासनाने महामार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केले. या बदलांमुळे आता सातारा जिल्ह्यालाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. सुधारित आराखड्यामुळे दुर्लक्षित आणि महामार्गापासून दूर असलेली अनेक गावे आता मुख्य प्रवाहात येणार आहेत.

advertisement

कोणत्या जिल्ह्यांना किती लाभ?

या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 73 गावे, सांगलीतील 25 गावे, सातारा जिल्ह्यातील 16 गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील 35 गावे थेट जोडली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावे कोणती?

हातकणंगले तालुका - जुने पारगाव, नवे पारगाव.

पन्हाळा तालुका - वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.

advertisement

करवीर तालुका - केर्ली केलें (रत्नागिरी नागपूर हायवे क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला.

राधानगरी तालुका - राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे. कागल तालुका : बोरवडे, उंदरवाडी.

advertisement

भुदरगड तालुका - नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली

आजरा तालुका - हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी. चंदगड तालुका : बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर

विकासाला मिळणार नवी दिशा

advertisement

शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योग, पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना गती मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच, या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतुकीत सुलभता येणार आहे.

महामार्गामुळे वाढणार आर्थिक संधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

या प्रकल्पामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बाजारपेठा, शेती उत्पादनांची वाहतूक आणि औद्योगिक विकास यांना गती मिळेल. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून विकासाचा नवा महामार्ग ठरणार असल्याचे मानले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावांतून 'शक्तिपीठ' महामार्ग जाणार! यादी आली समोर, तुमच्याही गावाचा समावेश आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल