शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना अंकुश काकडे म्हणाले की, अजित पवार यांनी काल वाढदिवसानिमित्त शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.त्यामुळे या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये,असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. पण राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकञ येण्यासंबंधी शरद पवार जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच असेल, असंही पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे.
advertisement
दरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे. माझे हे वैयक्तिक मत आहे. पण याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजित दादाच घेतील, असे सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे.
सुनंदा पवार पुढे म्हणाल्या, दोन्ही पिढ्या कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय. पवार साहेब याचा काल वाढदिवस होता, त्यामुळे ही कौटुंबिक भेट आहे, यात काही गैर नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि मलाही तसेच वाटतेय. आणि राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्रित यावे असं मला ही वाटत, असे सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे. तसेच सुनंदा पवार यांनी यावेळी राज्यात आलेल्या विधानसभा निकालावरही प्रतिक्रिया दिली. माझा विश्वास नाही.राज्यात एवढी नाराजी अनेक पक्षावर असताना हे निकाल पटत नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.
