राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहण्या मागचं कारण सांगितलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वत: मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मात्र संसदेचं अधिवेशन सोडून येणं शक्य नव्हतं. म्हणून मी आलो नाही, असं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे.
advertisement
मला मुख्यमंत्र्यांचा (देवेंद्र फडणवीस यांचा) फोन आला होता. त्यांनी स्वत: फोन केला होता. पण संसदेचे अधिवेशन सुरू होतं. त्यामुळे संसदेचे अधिवेशन सोडून शपथविधी सोहळ्याला येण शक्य नव्हतं.पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,असे शरद पवारांनी म्हटलं आहे.
शपथविधी सोहळ्यातील आमंत्रणाचा निरोप कोणाला दिला याली माहिती मला नाही. निरोप असता तर मी गेलो असतो. आम्हाला कधीच बोलावले नाही. माझे मित्र मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्या शुभेच्छा. आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. कंत्राटी भरती आम्ही बंद करू असे फडणवीस म्हणाले होते. आतास शिक्षकांच्या कत्राटची भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असे म्हणत नाना पटोले यांनी आपल्या अपेक्षा नव्या सरकारकडे व्यक्त केल्या आहेत.
