ममता बॅनर्जी यांच्या विधानाचं शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत आणि समाजवादी पक्षाने (एसपी) देखील समर्थन केलं आहे. राऊत शनिवारी म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं प्रमुख भागीदार व्हावं अशी आमची इच्छा आहे. ममता बॅनर्जी असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा शिवसेना असोत, आम्ही सगळे एकत्र आहोत. ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही लवकरच कोलकाता येथे जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
advertisement
ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, "ममता बॅनर्जींनी घेतलेली भूमिका आक्रमक आहे, त्यांनी अनेकांना पाठबळ देऊन उभं केलंय. त्यामुळे तसं बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे."