शरद पवारांनी टोचले कान
आजोबा शरद पवार यांनी पार्थ पवारांचे कान टोचले आहेत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांचं नाव न घेता, राजकारणात महत्त्वाच्या व्यक्तींवर किंवा विषयांवर भाष्य करताना परिपक्वता असणं आवश्यक असतं. पार्थ यांच्यात तितकी परिपक्वता आली आहे का, याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. यानंतर आत्या सुप्रिया सुळे यांनी देखील पार्थ पवारांचं विधान योग्य नसल्याचं सांगितलं. त्यांनी काँग्रेसची राज्यातील ताकद आणि काँग्रेसचा आवाका समजावून सांगितलं. तसेच पार्थला घरात सल्ला देईल, असं म्हटलं.
advertisement
रोहित पवार काय म्हणाले?
आजोबा आणि आत्यानंतर आता भाऊ रोहित पवार यांनीही पार्थ पवारांचं वक्तव्य चुकीचं होतं असं म्हटलं आहे. पार्थ पवारांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता रोहित पवार म्हणाले, "तुम्ही सत्तेत असला काय... किंवा विरोधात असला काय... तुम्ही जमीनीवर असणं फार महत्त्वाचं असतं. काल पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलं, ते योग्य नव्हतं. कुठं ना कुठं तरी त्यांच्या वक्तव्यात घाई गडबड जाणवली. कुठलाही पक्ष असा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या परीने ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल असं पक्ष संपला बोलणं, उचित नव्हतं."
"याबद्दल तुम्ही आज पुन्हा पार्थला या वक्तव्याबद्दल विचारलं तर कदाचित तो म्हणेल, कालचं वक्तव्य ओघात बोलून गेलो. माझ्या बोलण्याचा दुसरा अर्थ काढला, असं तो बोलेल. त्याचं वक्तव्य योग्य नव्हतंच. तरीसुद्धा अजितदादांच्या पक्षाकडून कुणी ना कुणी काँग्रेससोबत बोलेल, अशी अपेक्षा आहे", असंही रोहित पवार म्हणाले.
