पालिकेचा आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवत सोनावळे यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालय आणि लघुवाद न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे सोनावळे यांच्या नगरसेवक पदावर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शिवसेना शिंदे गटाचेच पदाधिकारी संदीप खरात यांनी सोनावळे यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती महानगरपालिकेचा थेट लाभार्थी असेल किंवा पालिकेशी संबंधित व्यावसायिक कंत्राटात सहभागी असेल, तर तिला निवडणूक लढवण्याचा अधिकार नसतो.
advertisement
सोनावळेंवर असलेले आरोप काय?
सोनावळे हे 'शिवशाही बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थे'चे अध्यक्ष आहेत. ही संस्था पालिकेच्या घनकचरा विभागाला मनुष्यबळ पुरवण्याचे काम करते. त्यामुळे सोनावळे हे महापालिकेचे कंत्राटदार असून त्यांना लाभ मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कामाचा मोबदला म्हणून संस्थेला मिळालेली काही रक्कम सोनावळे यांनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर वळवल्याचा दावा तक्रारदार खरात यांनी केला आहे.
कोर्टात याचिका....
या प्रकरणावर १३ जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. मात्र, त्यावेळी मतदान अवघ्या दोन दिवसांवर असल्याने न्यायालयाने ही सुनावणी एक महिन्यासाठी तहकूब केली होती. आता सोनावळे निवडून आले असले, तरी न्यायालयाच्या निर्णयावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, याचिकेमध्ये करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन आणि बिनबुडाचे असल्याचे सोनावळे यांचे वकील ॲड. आश्विन भागवत यांनी सांगितले.
