TRENDING:

Sangli Vita Nagar Parishad Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोठा 'चमत्कार', एकनाथ शिंदेंच्या तडाख्याने भाजपचा 'गड' उद्ध्वस्त

Last Updated:

विटा नगरपरिषदेत सत्तांतर घडवत माजी आमदार आणि भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी निकाल हे जाहीर झाले आहे. काही ठिकाणी महायुतीमध्येच काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. अशातच सांगली जिल्ह्यातील विटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजप आमदाराच्या 55 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.
News18
News18
advertisement

सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. विटा नगरपरिषदेत सत्तांतर घडवत माजी आमदार आणि भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे तर भाजपाला अवघ्या चार जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

advertisement

विटा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी तुरंगी लढत झाली होती. शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी शरद पवार गट,काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाने विटा नगर परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे.

सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल

1. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - विटा

advertisement

शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काजल मेत्रे विजयी

एकूण जागा – 26 (नगरसेवक निकाल)

भाजप - 4

अजित पवारांची राष्ट्रवादी - ०

काँग्रेस -०

शिंदे यांचे शिवसेना - 22

ठाकरेंची शिवसेना -०

शरद पवार राष्ट्रवादी -०

इतर –०

2. विभाग -,पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - ईश्वरपूर

नराध्यक्षपदाचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी

advertisement

एकूण जागा – 30

नगरसेवक निकाल

भाजप - 2

अजित पवारांची राष्ट्रवादी - 3

काँग्रेस -०

ठाकरेंची शिवसेना - 2

शरद पवार राष्ट्रवादी - 23

इतर –०

3. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर पंचायत - आटपाडी

नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार उत्तमराव जाधव विजयी

एकूण जागा – 17

भाजप - 7

advertisement

शिंदेंची शिवसेना - 8

अजित पवार राष्ट्रवादी -1

काँग्रेस - ०

ठाकरेंची शिवसेना -०

शरद पवार राष्ट्रवादी - ०

इतर – 1 ( तीर्थक्षेत्र विकास आघाडी)

4. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - पलूस

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या संजीवनी पुदाले विजयी

एकूण जागा – 20

नगरसेवक निकाल

भाजप - 1

अजित पवारांची राष्ट्रवादी - 4

काँग्रेस - 15

शिंदे यांचे शिवसेना -०

ठाकरेंची शिवसेना -०

शरद पवार राष्ट्रवादी -०

इतर –०

5. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - तासगाव

स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदी विजयी -बाबासाहेब पाटील

एकूण जागा – 24 (नगरसेवक निकाल)

भाजप -0

अजित पवारांची राष्ट्रवादी -0

काँग्रेस -0

शिंदे यांचे शिवसेना -0

ठाकरेंची शिवसेना -0

शरद पवार राष्ट्रवादी - 11

इतर – 13 ( स्वाभिमानी विकास आघाडी)

6. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - आष्टा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशाल शिंदे

एकूण जागा – 24

भाजप -0

अजित पवारांची राष्ट्रवादी - 1

काँग्रेस -0

शिंदे यांचे शिवसेना -0

ठाकरेंची शिवसेना -0

शरद पवार राष्ट्रवादी - 23

इतर –0

7. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर पंचायत - शिराळा

शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक विजयी

एकूण जागा – 17

भाजप - 9

अजित पवारांची व शरद पवारांची राष्ट्रवादी - 4

काँग्रेस -0

शिंदेचे शिवसेना - 2

ठाकरेंची शिवसेना -0

इतर – 2

8. विभाग - पश्चिम महाराष्ट्र

नगर परिषद - जत

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. रवींद्र आरळी विजय

एकूण जागा – 23

नगरसेवक निकाल

भाजप - 11

अजित पवारांची राष्ट्रवादी - 3

काँग्रेस - 9

शिंदे यांचे शिवसेना -0

ठाकरेंची शिवसेना -0

शरद पवार राष्ट्रवादी -0

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

इतर –0

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli Vita Nagar Parishad Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोठा 'चमत्कार', एकनाथ शिंदेंच्या तडाख्याने भाजपचा 'गड' उद्ध्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल