TRENDING:

ST Bus: धक्कादायक! वसईजवळ चालत्या एसटी बसचं चाक गेलं निघून, पुढे प्रवासी...VIDEO

Last Updated:

अर्नाळा-वसई या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचे चाकच निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एसटी बसमधील प्रवास सुरक्षित राहिला आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे.....

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजा मायाळ, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

वसई, ठाणे: एसटी बसचा प्रवास सुरक्षित असं साधारणपणे मानलं जातं. परंतु, अलीकडच्या काळात एसटीबाबत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एसटीतील प्रवासी खरंच सुरक्षित आहेत कां? असा प्रश्न मात्र या निमित्ताने निर्माण झाला आहे. आज वसईजवळच्या नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली, चालत्या एसटी बसच चाक निघून गेलं...

नेमकी काय घटना?

advertisement

एस.टी. महामंडाळाच्या बसेसची हालत अत्यंत खराव असल्याचं अनेकदा निदर्शनास येत असतं. याच ज्वलंत उदाहरण नालासोपाराच्या वाघोली येथे घडलेल्या प्रकाकावरुन दिसून येत आहे. अर्नाळा - वसईबसन सोबत एक भयंकर प्रकार घडला आहे.  एसटीचे चाक आज सकाळी वाघोली, सोजली तलावाजवळ निसटून गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

advertisement

प्रवासी सुरक्षित:  या बसमध्ये शासकीय कामावर जाणारे 20 ते 22 प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र या घटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वसईकरांनी केली आहे. या आधीही अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत. एसटी बसेस बाबत असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

advertisement

दुसरीकडे एसटी महामंडळाच्या चालकांकडून होणार बेदरकारपणा देखील अनेकदा समोर येत असतो. काल रायगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती.रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या वर असलेल्या पुलांवरून पाणी वाहत आहे. भेरव अंबा नदी पुलावरून पावसाचे पाणी ओसंडून वाहत असताना पाली बस स्थानकातून सुटलेली घोडेगाव मार्गे पेण बस अंबा नदीच्या पुलावर आली असता, पुलावरून पावसाचे पाणी जात असतानाही चालकाने थेट बस पाण्यात घातली. सुदैवाने बस पुलावरून पार झाली. मात्र थोडे जरी विपरीत घडले असते तर प्रवाशांसह बस वाहून गेली असती, आणि मोठा अनर्थ घडला असता.

advertisement

एसटी चालकाची स्टंटबाजी, पुरातून घातली बस, अंगावर शहारे आणणारा VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

या सर्व बाबींवर एसटी महामंडळ आणि राज्यसरकार एकत्रित कधी आणि काय उपाययोजना कऱणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालावं, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Bus: धक्कादायक! वसईजवळ चालत्या एसटी बसचं चाक गेलं निघून, पुढे प्रवासी...VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल