कणकवली: महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने सर्वात मोठा पक्ष असल्याचं दाखवून दिलं आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पण, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा बिनविरोध पॅटर्न यशस्वी करून दाखवला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये भाजपने ठाकरे गटाला सुरुंग लावला आहे. एकापाठोपाठ ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.
येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान आहे. त्यापूर्वीच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिला आहे. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम सुरूच आहे. महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खारेपाटण जिल्हा परिषदच्या उमेदवार प्राची देवानंद इसवलकर, कोकिसरे पंचायत समितीत साधना नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर जानवलीमधून रुहिता तांबे, बांदामधून प्रमोद कामत आणि वरवडे पंचायत समितीतून राजेश सावंत बिनविरोध निवडून आले आहे. तर संजना राणे बिडवाडी पंचायत समितीतून बिनविरोध निवडून आल्यात.
advertisement
कणकवलीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला सलग दुसऱ्या दिवशी धक्का
कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला धक्का तंत्राचा सलग सपाटा लावण्यात आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध झाल्या आहेत. कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारांची संख्या 3 तर कणकवली मतदारसंघात एकूण संख्या चारवर पोहोचली आहे.
कणकवलीत जानवलीमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराची माघार
तर कणकवली तालुक्यामध्ये भाजपा पाठोपाठ शिंदे शिवसेनेनं देखील बिनविरोध निवडीचं खातं उघडलं आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील महायुती मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे यांच्या विरोधातील हेलन कांबळे या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने आज माघार घेतल्याने जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेनेच्या रुहिता तांबे या बिनविरोध झाल्या आहेत. रुहिता तांबे या ओटव गावच्या सरपंच असून खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या पाठोपाठ ओटव गावच्या सरपंच रुहिता तांबे या बिनविरोध झाल्या आहेत.
वैभववाडीच्या साधना कोकिसरे बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकिसरे जिल्हा परिषद गटातून साधना सुधीर नकाशे बिनविरोध निवडून आल्या. वैभववाडीच्या पंचायत समिती निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न आल्यानं साधना कोकिसरे बिनविरोध निवडून आले आहेत.
बिडवाडीत संजना संतोष राणे बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्हापरिषद निवडणूकीत शिवसेना उबाठा गटाला धक्का बसला आहे. बिडवाडी पंचायत समितीच्या उबाठा उमेदवार विद्या विजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला आहे. तीन अपत्याच्या कारणाने विद्या शिंदे यांचा अर्ज बाद झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या संजना संतोष राणे बिनविरोध विजयी झाले आहेत.
वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध
पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यात धक्का बसला आहे. वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध आल्या आहेत. ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांनी माघार घेतली आहे.
सिंधुदुर्गात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या बिनविरोध उमेदवारी यादी
१) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली जि. प. उमेदवार; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल – जिल्हा परिषद;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे – जिल्हा परिषद ;अवनी अमोल तेली (भाजप)
पंचायत समिती कणकवली( बिनविरोध)
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती(बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
