सिंधुदुर्ग - सध्या सर्वत्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती सर्वच जण आपापल्या परीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सर्वांना यंदाची निवडणुक ही अत्यंत वेगळी अशी वाटत आहे. राज्यात मागील 5 वर्षात घडलेल्या घडामोडी पाहता यंदा सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकारणाचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणाचा विचार करता इथे गेल्या 60 वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळाली. ए. आर. अंतुलेंची धडाकेबाज कार्यशैली, नाथ पैंची संसदेत गाजलेली भाषणे, मधू दंडवतेंची देशपातळीवरील राजकारणातील विद्वत्तेची छाप यासाठी कधीकाळी कोकण ओळखले जायचे.
रायगडमध्ये सर्वसामान्यांसाठी शेकापने उभारलेली आंदोलने राज्यभर गाजायची. नंतर कोकण आणि शिवसेना हे समीकरण घट्ट होवू लागले. गेल्या काही वर्षात मात्र शिवसेना विरुद्ध नारायण राणे याहीपेक्षा ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष ही कोकणच्या राजकारणाची ओळख बनू लागली. याचाच एक अध्याय म्हणजे राणेंचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे वक्तव्य आणि त्याचे पडसाद यातून पहायला मिळाले. पण कोकणचे राजकारण कायमच असे आक्रमक होते का? या प्रश्नाचे उत्तर मात्र नाही असेच आहे.
Satara : शेतीची आवड, प्राचार्य पदाचा राजीनामा, तैवान पिंक पेरुतून घेतले लाखोंचे उत्पन्न
एकूणच कोकणातील ही राजकीय स्थित्यंतराची लाट खूप मोठे परिवर्तन करणारी ठरली. 90 च्या दशकानंतर भावनिक राजकारणाला येथे महत्त्व आले. शिवसेनेच्या आक्रमक शैलीमुळे काँग्रेसचे मवाळ राजकारण इतिहास जमा झाले. प्रशासकीय चौकट मोडून आक्रमक राजकारण गावोगाव रूजू लागले. विकासाच्या पातळीवर मात्र याचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. यामुळे आजही शाश्वत विकासाचे स्वप्न कोकणपासून दूरच आहे, असे दिसून येते.