Satara : शेतीची आवड, प्राचार्य पदाचा राजीनामा, तैवान पिंक पेरुतून घेतले लाखोंचे उत्पन्न

Last Updated:

satara farmer success story - डॉ. बापूराव जयवंत चोपडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी कृषी विद्यापीठातून एमएस्सी ऍग्रो आणि पीएचडी पदवीचे शिक्षण घेतले आहे. बापूराव चोपडे यांनी आपल्या 5 एकर माळरानावर तैवान पिंक पेरुची लागवड केली आहे.

+
डॉ.

डॉ. बापूराव जयवंत चोपडे

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा - अनेक जण नोकरी करत असताना त्यांना शेती करावीशी वाटते. त्यामुळे शेतीवरील प्रेमापोटी प्रसंगी ते नोकरीचा राजीनामा देतात आणि जिद्दीने शेती करुन त्यात यशस्वी होऊन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामादेऊन माळरानावर फळबाग फुलवली आणि लाखोंचे उत्पादन घेतले.
डॉ. बापूराव जयवंत चोपडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी कृषी विद्यापीठातून एमएस्सी ऍग्रो आणि पीएचडी पदवीचे शिक्षण घेतले आहे. बापूराव चोपडे यांनी आपल्या 5 एकर माळरानावर तैवान पिंक पेरुची लागवड केली आहे.
advertisement
बापूराव चोपडे हे कोल्हापूरातील तालुक्यातील कृषी महाविद्यालयात प्राचार्य पदावर नोकरी करत होते. मात्र, नोकरीत मन न रमल्याने राजीनामा देऊन ते गावाकडे आले आणि आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे वळाले. जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारीच्या जोरावर त्यांनी खडकाळ पडीक माळरान असलेल्या आपल्या 15 एकर जमिनीवर फळबाग लागवड केली. यातील 5 एकर जमिनीवर तैवान पिंक या पेरुची लागवड करून त्यांनी माळरान फुलवले आहे.
advertisement
पाण्याची टाकी कोसळून 3 कामगारांचा जागीच मृत्यू, पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
5 एकरमध्ये लागवडीसाठी 12 बाय 6 फूट पद्धतीचे अंतर ठेवून 3000 तैवान पिंक पेरुच्या जातीची रोपे लावली. या रोपां पाण्याची सोय म्हणून ठिबक सिंचनाद्वारे केली. त्याचबरोबर खत किड व रोगाचेही व्यवस्थापन चोखपणे ठेवले. यानंतर साधारणपणे 10 महिन्यांनी फळ झाडाला येऊ लागली. लागवड ते उत्पादन मिळवण्याचा कालावधीपर्यंत रोप लागवड, फवारणी, मजुरी, ठिबक सिंचन व इतर गोष्टी मिळून सुरुवातीला अंदाजे त्यांनी आपल्या शेतामध्ये 10 लाख रुपये खर्च केले. यावर्षी तैवान पिंकला बाजारामध्ये चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे यामुळे वर्षाखाली 90 ते 100 टन उत्पादनातून सर्व खर्च वगळता त्यांना निव्वळ नफा हा 25 ते 30 लाख रुपयांपेक्षा अधिक मिळू लागला.
advertisement
डॉ. बापूराव चोपडे यांनी युवा वर्गाला देखील मार्गदर्शन केले आहे. आजची युवा पिढीने 15 ते 20 हजाराच्या नोकरी मागे न लागता आपल्या शेतामध्ये फळ लागवड करावी. फळबागेच्या माध्यमातून वर्षासाठी एका एकरातून 5 ते 7 लाखापर्यंतचा निव्वळ नफा युवा शेतकरी घेऊ शकतात, तसेच शासनाकडून देखील फळबागेला अनुदान मिळत आहे. त्यामुळे तरुणांनी फळबागेकडे नक्की वळावे, असा आवाहनही त्यांनी लोकल18 शी बोलताना केले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Satara : शेतीची आवड, प्राचार्य पदाचा राजीनामा, तैवान पिंक पेरुतून घेतले लाखोंचे उत्पन्न
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement